उल्हासनगर: उल्हासनगर येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे धुळवड साजरी करून परतणाऱ्या तरूणीचा भर रस्त्यात विनयभंग करण्यात आला आहे. काही टवाळखोरांनी तरूणीचा रस्ता अडवून तिला मारहाण करून तिचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावेश होटचंदानी, रोहित जग्याशी अशी आरोपींची नावे आहेत.
अधिक माहिती अशी की, उल्हासनगरमधील कॅम्प क्रमांक 1 मधील फक्कड मंडली ते झूलेलाल मंदिर परिसरात एका तरूणीसोबत विनयभंगाचा प्रकार घडला आहे. धुळवड साजरी करून तरूणी आपल्या घरी जात होती. यादरम्यान, काही टवाळखोरांनी तिला अडवलं. तरूणीचा रस्ता अडवून तिचा विनयभंग केला. तरूणीसोबत केलेली मारहाण आणि विनयभंगाचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली.
याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.