रायगड: रायगड मधील महाड येथुन दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ओमकार रजनिकांत रणदिवे (वय- 27) याच्या विरुद्ध महाड शहर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी ओमकार रणदिवे विनयभंग करून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 2 अल्पवयीन मुली क्लासवरून घरी जात असताना आरोपी ओमकार रणदिवे याने दोन्ही मुलींना सोसायटीच्या ऑफिसमध्ये ओढले. त्यानंतर दरवाजा बंद करून घेतला. दरवाजा बंद करून आरोपीने मुलींसोबत असभ्य वर्तन केले. असभ्य वर्तन करून तो फरार झाल्याची माहिती मिळत आहे.