मुंबई : मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये यापुढे अश्विनी भिडे या काम करताना पाहायला मिळणार आहेत.
सध्या या पदाचा कार्यभार अधिकारी ब्रिजेश सिंह यांच्याकडे आहे. आता अश्विनी भिडे यांना त्वरीत या पदाचा कारभार हाती घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत मेट्रोच्या व्यवस्थापकीय पदाचा कार्यभार सांभाळण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
अश्विनी भिडे या 1995 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. मुंबई मेट्रोच्या जबाबदारीमुळे त्यांना ‘मेट्रो वुमन’ म्हणून देखील ओळखले जाते. आता त्या मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव म्हणून काम पाहणार आहेत.