पुणे : कोणताही व्यवसाय सुरू करताना आर्थिक मदत आणि अनुदानासाठी अधिकृत नोंदणी गरजेची असते.त्यानुसार शासनाच्या विविध सवलती आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी पर्यटन केंद्रांची अधिकृत नोंदणी आवश्यक आहे.
प्रशिक्षण आणि मार्गदर्शन सुविधा :
केंद्र चालकांना अन्न सुरक्षा, स्वच्छता, आतिथ्य, विपणन, आदर्श शेती व अनुभवाधारित पर्यटन याबाबत तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाते.नोंदणीकृत केंद्रांची माहिती पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते. विपणनासाठी खासगी, शासकीय आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले जातात.
नोंदणीसाठी अर्ज प्रक्रिया :
पर्यटन संचालनालयाच्या www.maharashtratourism.gov.in संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येतो. प्रादेशिक उपसंचालकांच्या कार्यालयातही अर्ज उपलब्ध आहेत. अर्जासोबत 7/12 उतारे, 8अ दस्तऐवज, आधार कार्ड / पॅन कार्ड,वीज बिल, नोंदणी शुल्क भरल्याचा पुरावा, अन्न सुरक्षा परवाना बांधकाम परवाना आवश्यक आहे.