India vs Pakistan: आज (दि.23) दुबईच्या मैदानात चॅम्पियन ट्रॉफीचा भारत विरुद्ध पाकिस्तान असा बहुप्रतिक्षीत सामना होत आहे मात्र, या सामन्या दरम्यान भारताचा धडाकेबाज फलंदाज हार्दिक पांड्याची कथित गर्लफेंड स्टेडियम मध्ये झळकली आहे. तिचे फोटोही समोर आले आहेत. जॅस्मीन वालिया असं हार्दिकच्या कथिक गर्लफ्रेंडचं नाव आहे. सध्या तिचे फोटो समाजमाध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
सामन्यात हार्दिक पांड्याची कथिक गर्लफ्रेंड..
आज(ता. 23) भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना दुबईत रंगला आहे. हा बहुप्रतीक्षित सामना पाहण्यासाठी दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याने दुबईचे स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेले आहे. याच सामन्यात हार्दिक पांड्याची कथिक गर्लफ्रेंड हा सामना पाहण्यासाठी आली आहे. तिने स्टेडियममध्ये येताच कॅमेरामॅनने तिला कॅमेऱ्यात कैद केले आहे. त्या तरुणीचं खरं नाव जॅस्मीन वालिया असं आहे. जॅस्मीन वालियाचे फोटो सध्या समाजमाध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
हार्दिक पांड्या जॅस्मीनच्या प्रेमात..
नताशा आणि हार्दिक पांड्या यांनी एकमेकांना अधिकृतपणे घटस्फोट दिला होता. त्यानंतर आता हार्दिक पांड्या हा जॅस्मीनच्या प्रेमात पडल्याचं बोललं जात आहे. हार्दिकची कथित गर्लफ्रेंड जॅस्मीन वालिया भारत विरुद्ध पाकिस्तानचा मॅच पाहण्यासाठी पांढऱ्या ड्रेसमध्ये आली आहे. यावेळी तिने तिचे केस मोकळे सोडलेले आहेत. डोळ्यांवर काळा गॉगल लावल्याने ती सुंदर दिसत असल्याचं चाहत्यांकडून इंटरनेटवर बोललं जात आहे. विशेष म्हणजे या सामन्यात जॅस्मीन हार्दिकला चिअर करत असल्याचंही दिसून आलं आहे.