Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स टॉफी २०२५ मधील बहुचर्चित भारतविरुद्ध पाकिस्तानचा सामना दुबई येथे आज होणार आहे. सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष या सामन्याकडे लागून आहे. भारत पाकिस्तानचा सामना असला की चाहत्यांसाठी एक मोठी पर्वणीच असते. २०१७ च्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. आज मात्र टीम इंडिया त्या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
आताच्या परिस्थिती दोन्ही संघाची स्थिती पाहिली तर भारतीय संघ पाकिस्तानच्या तुलनेत वरचढ दिसत आहे.चॅम्पियन्स टॉफीची सुरुवात भारतीय संघासाठी शानदार राहिलीया आहे. टीम इंडियाने बांगलादेशला पराभूत करत या स्पर्धेला जोरदार सुरवात केली आहे.
तर पाकिस्तान संघाची या स्पर्धेत सुरुवात खराब झाली आहे. पाकिस्तानचा सामना न्युझीलंडसोबत झाला होता. यामध्ये पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमानला दुखापत झाली होती. त्यामुळे तो या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. ज्यामुळे भारताला २०१७ मध्ये पराभव पत्कारावा लागला होता. फखर जमानने भारताविरुद्ध फलंदाजी करताना शतकी खेळी केली होती, त्याच्या या खेळीमुळे भारताचा पराभव झाला होता.
भारत आणि पाकिस्तानमधील सामना कुठे बघाल?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा सामना २.३० वाजता सुरू होणार आहे. या दोन्ही देशातील क्रिकेट सामना स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनलवर बघायला मिळणार आहे. जर तुम्हाला हा सामना ऑनलाईन पाहायचा असेल तर तुम्ही Jio Hotstar वर मोफत पाहू शकतात. BCCI ने ऑनलाइन क्रिकेट सामन्याचं प्रेक्षपणाचे अधिकार Hotstar ला देण्यात आलेत.
Hotstar आता Jio Hotstar म्हणून ओळखले जाते. येथे तुम्ही मोफत हा सामना पाहू शकतात. Jio 899 प्रीपेड प्लॅनमध्ये मोफत JioHotstar मोबाइल सबस्क्रिप्शन प्लॅन 90 दिवसांसाठी डेटा, व्हॉइस कॉलिंगसह दिला जातो. हा प्लान 90 दिवसांच्या वैधतेसह येतो. युझर्सला कॉलिंगची सुविधा सुद्धा मिळणार आहे. तसेच दररोज 2GB डेटाही मिळेल.