Ind Vs Nz Champions Trophy2025 : आज (9 मार्च)आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामना दुबईत होत आहे. या अंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आहेत. दुबईतील दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळला जात आहे. यावेळी भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलही सामना पाहण्यासाठी पोहोचला आहे. मात्र त्यावेळी त्याच्यासोबत एक मिस्ट्री गर्ल बसलेली दिसत आहे. तिने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिला पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांची विविध चर्चा होऊ लागली आहे.
चहल सोबत दिसलेली मिस्ट्री गर्ल कोण?
यावेळी युजवेंद्र चहलचे स्टेडियममध्ये बसलेला दिसल्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले. या फोटोंमध्ये तो मिस्ट्री गर्लसोबत दिसत आहे. युजवेंद्र चहल सोबत दिसणारी मुलगी ही त्याची मैत्रीण आहे. तिची ओळख आरजे मैहवश अशी आहे. आता त्या दोघांना एकत्र पाहून त्यांच्या अफेअरच्या चर्चा सोशल मिडियावर रंगल्या आहेत. मात्र, ती मिस्ट्री गर्ल चहलची गर्लफ्रेंड असल्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र याबाबत चर्चा रंगल्या आहेत.