Rohit Sharma : टीम इंडियाची चिंता मिटवणारी बातमी समोर आली आहे. कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म परत आला आहे. मागच्या 16 डावात रोहित शर्माच्या फलंदाजीतून फक्त एक अर्धशतक आलं होतं. त्यानंतर सातत्याने रोहित शर्मा अपयशी ठरत होता. मात्र रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात दणदणीत शतक ठोकत आपण फॉर्ममध्ये परत आल्याचे दाखवून दिले आहे.
रोहित शर्माचा आक्रमक अंदाज या सामन्यात अनुभवायला मिळाला. रोहित शर्मा टीम इंडियाला चांगली सुरुवात करून देत होता. त्यामुळे वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत टीम इंडियाला चांगलाच फायदा झाला होता. आता त्याचा हाच अंदाज चॅम्पियन्स ट्रॉफीतही पाहायला मिळणार आहे.
रोहित शर्माने आपल्या फलंदाजीने टीकाकारांची तोंड बंद केली आहेत. मागील काही दिवसांपासून रोहित शर्माला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात होतं. पण आता मात्र कौतुक होताना दिसत आहे. रोहित शर्माने अवघ्या 76 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. रोहित शर्माची वनडे क्रिकेटमधील तिसरी वेगवान अर्धशतकी खेळी ठरली आहे.
यापूर्वी शर्माने 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध 27 चेंडूत, 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 29 चेंडूत, 2023 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 30 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. आता इंग्लंडविरुद्ध 30 चेंडूत अर्धशतक म्हणजे 52 धावा ठोकल्या. रोहित शर्माच्या वनडे कारकिर्दितलं हे 58वं अर्धशतक आहे.
इंग्लंडने दुसऱ्या वनडे सामन्यात 304 धावांची खेळी केली असून 305 धावा जिंकण्यासाठी दिल्या आहेत. या सामन्यात रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी चांगली सुरुवात करून दिली. रोहित शर्मासह शुबमन गिलनेही अर्धशतक पूर्ण केलं आहे. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 136 धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने 90 चेंडूत 119 धावा केल्या आहेत.