India vs New Zealand Champions Trophy 2025 Final : भारताचा धडाकेबाज फलंदाज आणि कर्णधार हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने दुबई येथे झालेला न्यूझीलंड विरुद्धचा अंतिम सामना जिंकला आहे. या विजया बाबरोबरच टीम इंडियाचा 12 वर्षांचा आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी व्हा दुष्काळ संपला आहे. 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवली होती. त्यानंतर आता तब्बल 12 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 5 गडी राखून भारतीय संघाने पराभव केला. भारतीय संघ तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता ठरला आहे.
न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रचीन रवींद्रच्या फटकेबाजीमुळे 10 षटकांत एक बाद 69 अशी वेगवान सुरुवात न्यूझीलंडने केली होती. त्यानंतर भारतीय फिरकी पटुंनी चांगली कामगिरी करत किवींच्या आक्रमक फलंदाजीला रोखले. रचिन रवींद्रने 29 चेंडूत 37 धावांची जलद खेळी केली. केन विल्यमसन फक्त 11 धावा काढून बाद झाला, परंतु डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांच्या भागीदारीने 57 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या मिशेलने 63 धावा तर फिलिप्सने 34 धावा केल्या. त्यानंतर मायकेल ब्रेसवेलने धडाकेबाज फलंदाजी करत नाबाद 53 धावा केल्या. यामुळे न्यूझीलंडला या सामन्यात 251 धावांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.
या सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. भारतीय फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने यंग आणि ग्लेन फिलिप्सला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. या सामन्यात कुलदीप यादवनेही 2 विकेट घेतल्या. त्यानंतर भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजाने लॅथमची विकेट काढत पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर वेगवान गोलंदाज मुहम्मद शमीने 1 विकेट घेतली. अशा पद्धतीने भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत अखेर 12 वर्षांनंतर चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे.