Champion Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीत मोठा उलटफेर झाल्याचे समोर आले आहे. ऑस्ट्रेलियासोबत नशिबाने मोठा खेळ केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आयसीसी स्पर्धेत हे दोन्ही संघ एकमेकांना तुल्यबळ ठरतात. मात्र यामध्ये ऑस्ट्रेलियाचं पारडं कायमच जड असल्याचं दिसून आलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत उपांत्य फेरीचं गणित सोडवण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील सामना महत्त्वाचा होता. पण यावेळीही ऑस्ट्रेलियाला पावसाचा फटका बसल्याच बोललं जात आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे थेट उपांत्य फेरी गाठण्याचं स्वप्न आता जर तरवर अबलंबून आहे.
पावसामुळे सामना रद्द झाल्याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आलाया आहे. ऑस्ट्रेलियाला आता उपांत्य फेरी गाठायची असेल तर अफगाणिस्तानविरुद्धचा सामना जिंकावाच लागणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी हा सामना करो या मरोची लढाई असणार आहे. मागच्या दोन पर्वात देखील ऑस्ट्रेलियाला पावसाचा असाच फटका बसला होता. आत पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला पावसामुळेच चॅम्पियन ट्रॉफीपासून लांब जावं लागते का? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
- 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सातव्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आमनेसामने आले होते. पण पावसामुळे हा सामना रद्द झाला आणि ऑस्ट्रेलियाचं उपांत्य फेरीचं गणित चुकलं.
- 2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील ऑस्ट्रेलियाचे दोन सामने रद्द करण्यात आले. न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्धचे सामने पावसामुळे रद्द झाल्याने
- ऑस्ट्रेलियाचा संघ साखळी फेरीतच बाद झाला.
- 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सातव्या सामन्यातही पावसाने व्यत्यय आणला आहे. त्यामुळे 2 गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचण्याची अपेक्षा असलेल्या
ऑस्ट्रेलियन संघाला फक्त एक गुण मिळाला.
ऑस्ट्रेलियाचा संघ: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), , अॅलेक्स कॅरी, शॉन अॅबॉट बेन, द्वारशुइस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, नॅथन एलिस, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघ, मॅथ्यू शॉर्ट, अॅडम झांपा.