राजेंद्रकुमार शेळके
पुणे : राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेमध्ये वाशी येथील निवासी मतिमंद मुलांनी सुवर्ण कामगिरी केली आहे. या स्पर्थेत विद्यार्थ्यांनी सुवर्ण आणि कांस्य पदके जिंकली आहे.
जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेचे आयोजन पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत वाशी येथील निवासी मतिमंद विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. सात खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
आशिष क्षिरसागर याने बहुवीकलांग ०८ ते १२ वयोगटामध्ये बकेट मध्ये बॉल टाकणे या क्रिडा प्रकारात सुवर्ण पदक पटकाविले आहे. तर बहुवीकलांग १३ ते १६ वयोगटाम६ध्ये बकेट मध्ये बॉल टाकणे या क्रिडा स्पर्धा मध्ये विकास मोराळे याने तिसऱ्या कांस्य पदकाची कमाई केली.
दरम्यान, विजेत्या खेळाडूंना शाळेतील विशेष शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. या कामगिरीसाठी शिव शारदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती माने व संचालक माने तसेच संस्थेचे सचिव भायगुडे सर यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.