पुणे: पुण्यातील भोर तालुक्यात वॉटर पार्कमध्ये झालेल्या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजगड वॉटर पार्क येथे ही घटना घडली असून जिथे तरल अटपाळकर ही तरुणी तिच्या कुटुंबासह सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेली होती. झिपलायनिंग वेळी ३० फूट उंचीवरून पडल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ३० फूट उंचीवरून पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान, तरुणीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिला मृत घोषित करण्यात आले. तरल अटपाळकर ही शुक्रवारी कुटुंबियांसोबत भोरजवळ असलेल्या राजगड वॉटरपार्कमध्ये गेली होती. तरुणी पुण्यात नन्हे परिसरात राहत होती. तरुणीच्या अपघातीमृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
येथे पाहा व्हिडीओ:
तरलच्या मृत्यू प्रकरणी वॉटरपार्क चालक आणि मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. पोलिस घटनेचा तपास करत आहेत. कुटुंब न्यायाची मागणी करत आहे आणि वॉटर पार्क व्यवस्थापनावर त्यांच्या कथित निष्काळजीपणाबद्दल कारवाईची मागणी करत आहे. या घटनेमुळे वॉटर पार्क आणि साहसी केंद्रांमधील सुरक्षा उपायांबद्दल चिंता निर्माण झाली आहे.