खेड-शिवापूर, ता. 6 : पुणे-सातारा महामार्गावरील ठिकठिकाणी तोडलेले बेकायदेशीर दुभाजक बंद करण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरुवात केली आहे. मात्र यापुढे पुन्हा दुभाजक बेकायदेशीरपणे तोडले जाणार नाहीत, याची दक्षता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला घ्यावी लागणार आहे.
पुणे सातारा रस्त्यावर शिंदेवाडी ते सारोळा दरम्यान अनेक ठिकाणी व्यावसायिकांनी बेकायदेशीरपणे दुभाजक तोडले होते. या तोडलेल्या दुभाजकांमुळे सदर ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे बेकायदेशीर तोडलेले दुभाजक बंद करण्यास सुरुवात केली आहे.
शिंदेवाडी ते सारोळा पर्यंत तोडलेले सर्व दुभाजक बंद करण्यात येणार आहेत. मात्र यानंतर पुढील काळात हे दुभाजक तोडण्यात येणार नाहीत, याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.