शिक्रापूर(पुणे): शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायत कासारी येथील कल्पतरू महिला ग्रामसंघ यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत वार्षिक सर्वसाधारण सभा व सायबर सुरक्षा प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे केले होते. जागतिक महिला दिनानिमित्त प्रथमच कासारी गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात तालुक्यातील अधिकाऱ्यांनी हजेरी लावली.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून बाळासाहेब मस्के (तहसीलदार शिरूर), महेश डोके (गटविकास अधिकारी पं. स. शिरूर), अशोक भोरडे (राज्यअध्यक्ष ग्राहक पंचायत संस्था पुणे), नवनाथ विलास भुजबळ (भाजपा युवा मोर्चा महा.प्रदेश सदस्य), रामेश्वर राठोड (प्रशासक ग्रामपंचायत कासारी), रुपाली भुजबळ (पोलिस पाटील कासारी), वसंत पवार (ग्रामसेवक ग्रामपंचायत कासारी), भगवान विधाते (शाखाधिकारी महावितरण शिक्रापूर), संतोष पोटावळे, श्रीकांत ताटी कोंडा (शाखाधिकारी महावितरण तळेगाव ढमढेरे), राणी कारंडे (कृषी सहाय्यक), पांडूरंग सुर्यवंशी तसेच कासारी ग्रामपंचायत माजी सरपंच, उपसरपंच, आणि एमकेसीएल अंतर्गत ए एस एन कम्प्युटर इन्स्टिट्यूट येथील प्रशिक्ष ,आणि ग्राम संघ पदाधिकारी व सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
तहसीलदार शिरूर बाळासाहेब म्हस्के यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिलांनी कामाबरोबर आरोग्याची ही काळजी घ्यावी, तसेच महिला आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात कोणत्याही क्षेत्रात महिला आता मागे राहीलेल्या नाहीत असे सांगितले.
गटविकास अधिकारी महेश डोके यांनी महिलांना सायबर सुरक्षा प्रशिक्षण विषयी व सायबर क्राईम कसे होतात त्यातून आपला बचाव कसा करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच विविध शासकीय योजना विषयी माहिती दिली व महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यानंतर तहसीलदार शिरूर यांना कल्पतरू ग्राम संघाच्या अध्यक्ष, सचिव यांनी ग्रामसंघाला हक्काचे व्यासपीठ अस्मिता भवन मिळावे यासाठी निवेदन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री वायदंडे (सीआरपी), प्रास्ताविक सोनल सोनोने(प्रभाग समन्वयक), लिपिका वाचन जयश्री रासकर यांनी केले. भोजन समारंभ झाल्यानंतर महिला दिनानिमीत्त विविध मनोरंजनपर कार्यक्रम घेण्यात आले.