युनूस तांबोळी
शिरूर(पुणे): मीना शाखा कालव्यास रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन 17 फेब्रुवारी 2025 पासुन सुरू असुन त्याचा फायदा रब्बी हंगामातील कांदा, ऊस, भाजीपाला, फळबाग व जनावरांचे खाद्य या पिकाला झाला आहे. याचा कालव्यावरील 20 गावातील 23 पाणी वापर संस्थांच्या 14 हजार 694 हेक्टर क्षेत्रावरील सर्व पिकांना फायदा होणार आहे. कालव्यावर 8 हजर 743 व कोप उपसावर 3 हजार 560 म्हणजे 12 हजार 303 हेक्टर वरील 20 गावातील क्षेत्राचे फॉर्म जलसंपदा विभागाला संस्थांनी व शेतकऱ्यांनी भरून दिले पाहीजे. अशी अपेक्षा अध्यक्ष मीना शाखा कालवा व घोड/कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार सदस्य प्रकाश वायसे यांनी व्यक्त केली आहे. सध्या आवर्तन सुरू असुन टाकळी हाजी व जाबुंत शाखेचे आवर्तन पुर्ण झाले आहे.
गेल्या पाच वर्षात कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर व उपविभागीय अधिकारी आर.जी.हांडे तसेच टाकळी हाजी, जांबुत, शिरोली येथील शाखा अधिकारी व कर्मचारी यांनी नियोजन पुर्वक काम करून आवश्यक त्या वेळेस आवर्तन दिल्याने सर्व शेतकरी व पा.वा संस्था जलसंपदा विभागाचे आभार मानले.
सर्व संस्था प्रत्येक आर्थिक वर्षात वेळेत पाणी पट्टी भरणा करत असुन सन 2023-24 या आर्थिक वर्षातील 23 पाणी वापर संस्थाची एकुन पाणी पट्टी 16 लाख 59 हजार 746 रुपये इतकी आहे. त्या पैकी 14 पा.वा. संस्थानी 11 लाख 7 हजार 754 रुपयांचा भरणा पुर्ण केला असुन राहिलेल्या 9 पाणी वापर संस्था 5 लाख 72 हजार 822 इतक्या रकमेचा भरणा लवकरच करतील. त्यासाठी मीना शाखा कालव्याचे अध्यक्ष व सचिव सबंधित संस्थाच्या सतत संपर्कात आहेत व जलसंपदा विभागाचा भरणा त्वरीत करावा म्हणुन पाठपुरावा करत आहेत.
शिरूर तालुक्यातील वडनेर या गावातील सर्व शेतकऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना एकत्र करून अध्यक्ष प्रकाश वायसे व सुभाष झिंजाड यांनी पाण्याचे महत्व पटवुन दिल्याने संपुर्ण गावाची पाणीपट्टी एकरकमी भरणा केली आहे. यासाठी गुरुनाथ पाणी वापर संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महत्वाची भुमिका बजावली.
भविष्यात उन्हाळ हंगामाच्या पाण्याची आवश्यकता भासणार असून संस्था कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी आपला पाणी मागणी अर्ज सबंधित संस्थेकडे भरून द्यावा. शेतकऱ्यांचे पाणी मागणी अर्ज आले तरच उन्हाळा हंगामाच्या पाण्याची मागणी करता येईल. प्रत्येकाने जागरुक राहुन पाण्यावरील आपला हक्क आबाधित ठेवावा अशी माहीती प्रकाश वायसे यांनी दिली .