उरुळी कांचन, (पुणे) : येथील उरुळी कांचन डॉक्टर्स वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी पूजा क्लिनिकचे डॉ. गणेश आखाडे यांची तर उपाध्यक्षपदी डॉ. सौ उमा संतोष कथले व डॉ. प्रशांत शितोळे यांची बिनिविरोध निवड करण्यात आली आहे.
डॉक्टर्स वेलफेअर असोसिएशनची नुकतीच सर्वसाधारण सभा उरुळी कांचन (ता. हवेली) येथे पार पडली. उरुळी कांचन परिसरातील डॉक्टरांची ही संघटना आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. संतोष राठोड, डॉ. समीर ननावरे उपस्थित होते. मावळते अध्यक्ष डॉ. संतोष राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने उरुळी कांचन डॉक्टर्स वेलफेअर असोसिएशनची बैठक घेण्यात आली होती.
या बैठकीत सन 2025 ते 2026 साठी नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. उरुळी कांचन येथील डॉक्टरांच्या उपस्थितीत एकमताने या कार्यकारणीची निवड करण्यात आली. डॉ. संतोष राठोड, डॉ. समीर ननावरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत पुढील दोन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली.
दरम्यान, यावेळी डॉ. राजेंद्र भोसले, डॉ. रविंद्र भोळे, डॉ. दत्तात्रय वाकसे, डॉ. शैलेश कांचन, डॉ. प्रशांत शितोळे, डॉ. विजय फडतरे डॉ. विकास थोरात डॉ. मयूर लिंबोरे डॉ. नील शिर्के डॉ. राज दिवेकर, डॉ. सुबंद मॅडम, डॉ. राजश्री मोटे, डॉ. शिर्के, डॉ. गायकवाड मॅडम, डॉ. पांडुरंग गायकवाड, आदी डॉक्टर उपस्थित होते.
कार्यकारिणी समिती पुढीलप्रमाणे
अध्यक्ष :- डॉ. गणेश आखाडे
उपाध्यक्ष :- डॉ. प्रशांत शितोळे, उमा कथले
सचिव :- डॉ. शरद गोते
सह सचिव :- डॉ. परिमल परदेशी
खजिनदार :- डॉ. समीर ननावरे
सह. खजिनदार :- डॉ. विजय फडतरे
कार्याध्यक्ष :- सुनील गांगुर्डे