पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशभरातील विद्यापीठांना लोकपाल नियुक्ती करण्याबाबत आदेश दिले होते. मात्र, देशातील अनेक विद्यापीठांनी त्याचे पालन केले नाही. दरम्यान, देशभरातील ४२१ विद्यापीठांनी लोकपाल नियुक्तीबाबतची माहिती यूजीसीकडे सादर केलेली नाही. लोकपाल नियुक्तीचा तपशील सादर न केलेल्या विद्यापीठांमध्ये राज्यातील सरकारी आणि खासगी विद्यापीठांचाही समावेश आहे.
या यादीमध्ये महाराष्ट्रातील १७ विद्यापीठांचा समावेश आहे. यूजीसीने विद्यापीठांना ३१ डिसेंबरपर्यंत नियमानुसार लोकपाल नियुक्त करण्याचा इशारा दिला होता. परंतु, दिलेल्या मुदतीनंतरही विद्यापीठांनी नियमांची पूर्तता केली नाही. या विद्यापीठांची यादी यूजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केली दिली.
महाराष्ट्रासह यूपी, हरियाणा, हमाचल, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, दिल्ली, पंजाब, तेलंगणा, पश्चिम बंगाल आदी राज्यांमधील विद्यापीठांचा डीफॉल्ट यादीत समावेश केला आहे. यामध्ये सर्वाधिक २५६ राज्य विद्यापीठे आहेत. नॉर्थ-ईस्टर्न हिल्स युनिव्हर्सिटी, शिलाँग हे एकमेव केंद्रीय विद्यापीठ आहे. तर १६२ खासगी विद्यापीठे आणि दोन डीम्ड-टू-बी विद्यापीठे आहेत. यामध्ये राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ वगळता राज्यातील बहुतांश सर्व विद्यापीठांची नावे आहेत.
युजीसीच्या डीफॉल्ट यादीतील राज्यातील नावे
- आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, बालेवाडी, पुणे,
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, रायगड
- डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबई
- गोंडवाना युनिव्हर्सिटी, गडचिरोली
- हैदराबाद राष्ट्रीय कॉलेजीट विद्यापीठ – वरळी
- कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
- महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ अॅण्ड सायन्स, नाशिक
- महाराष्ट्र अॅनिमल अॅण्ड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी, नागपूर
- महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई
- महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर
- महात्मा कृषी विद्यापीठ, राहुरी
- महाराष्ट्र अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटी, परभणी
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
- संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी, अमरावती
- श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरे महिला विद्यापीठ, मुंबई
- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ.