पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील बलात्कार प्रकरणाने पुण्यासह संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर अटक करण्यात आली आहे. मध्यरात्री 1 च्या सुमारास आरोपी गाडेला शेतातून अटक करण्यात आलीया आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या 13 टीम तयार करण्यात आल्या होत्या. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी हे सर्व ऑपरेशन कशा पद्धतीने केलं, त्याबद्दल
माहिती दिली.
नेमकं काय म्हणाले पोलीस आयुक्त?
“आरोपीला कळणार नाही अशा पद्धतीने गुप्तपणे आमचा शोध सुरू होता. तो लवकरच गावात सापडेल अशी आशा होती. मात्र तो सापडत नव्हता. त्यातच आम्ही त्याचा शोध घेत असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यामुळे आम्ही ओपन ऑपरेशन सुरू केलं” असं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.
पुढे ते म्हणाले की “अहिल्या नगरात एक गुन्हा असल्याने अशा प्रकारचा गुन्हा करेल हे आमच्या रडारवर नव्हतं. आता ज्या गुन्ह्यावर एकापेक्षा जास्त विनयभंग, किंवा एका पेक्षा अधिक बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. त्यांची डिटेल्स काढण्यात येत आहे. अशा लोकांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे” अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.
गळ्यावर मार्क..?
“गाडेची प्राथिमक आरोग्य तपासणी झाली असून त्याच्या गळ्यावर मार्क आहे. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं. दोरी तुटली आणि लोक घटनास्थळी आले त्यामुळे आत्महत्या होऊ शकली नसल्याचं सांगण्यात येत आहे.” असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या या माहितीमुळे त्याने अटक होण्याआधी आत्महत्येचा प्रयत्न केला होता का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.