शिरूर : शिरूर तालुक्यात तब्बल सहा ठिकाणी दिवसाढवळ्या घरफोडी करत अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कमेसह लाखो रुपयांचे सोन्याच्या दागिन्याने चोरून नेले. सदर घटना गुरुवारी (दि. १६) दुपारी बारा ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत कांचन सोमनाथ दसगुडे (वय ५५ रा. दसगुडे मळा, रामलिंग शिरुर, ता. शिरुर जि. पुणे), तसेच दुसऱ्या घटनेत सुभाष बयाजी कोल्हे (वय ५७ रा. मोटेवडी, कोल्हेवस्ती निमोणे ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर शहराजवळील दसगुडे मळ्यातील फिर्यादी कांचन दसगुडे यांच्या बंद असलेल्या घराची कडी उघडुन अज्ञात चोरट्यांनी तब्बल ६ लाख ७६ हजार रुपयांच्या दागिन्यांची लूट करीत ५० हजार रुपयांची रोख रक्कम चोरुन नेली आहे. सदर घटना दसगुडे मळा येथे गुरुवारी दुपारी तीन ते साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. सदर गुन्हात पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहेत.
दुसऱ्या घटनेत सुभाष बयाजी कोल्हे, जनाबाई शिवाजी कोल्हे व प्रणव राजेंद्र जगदाळे (सर्व रा. मोटेवाडी, कोल्हेवस्ती निमोणे ता. शिरुर जि. पुणे) यांच्या घरी गुरुवारी साडे बारा ते दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत ३ लाख १३ हजार २०० रुपयांचे सोन्याचे दागिने व ३१ हजार रुपये रोख रक्कम चोरुन नेली आहे. तसेच चोरट्यांनी बाभुळसर खुर्द व दुर्गे वस्ती येथेही घरफोडी केली आहे. परंतु या दोन्ही घटनेतील चोरीच्या मालाचा तपशील समजला नाही.
पोलिसांनी दोन्ही घटनेत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, तालुक्यात दिवसाढवळ्या फरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी दिवसाही गस्त सुरु करावी, अशी मागणी नागरिकांनी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोरे हे करीत आहेत.
माझी होंडा शाईन गाडी नं MH 12KG 2765 दिनांक 17/01/2025 रोजी शिरूर पोस्ट ओफिस गेट समोरून दुपारी 12.05ते 12.20मी.चोरीला गेली
खुप शोध घेतला आणि तक्रार दाखल केली
आश्चर्य या गोष्टीच आहे की पोस्ट ओफिस ला CCTV नाहिये असं सांगितलं मला.शासकीय कार्यालयात CCTV असतातच .
नम्र विनंती आहे की .
It’s my kind request regarding to issue shirur post office should install CCTV for inconvenience