शिरूर,(पुणे): राहत्या घरात लोखंडी अँगलला दोरीच्या सहायाने गळफास घेऊन एका 19 वर्षीय तरुणाने अज्ञात कारणावरून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मलठण (ता. शिरुर) ग्रामपंचायत हद्दीत रविवारी (ता. 02) हि घटना घडली आहे.
तन्मय रामदास कदम (वय – 19, रा. मलठण ता. शिरूर), असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत रामदास सत्तू कदम वय 42, रा. सदर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास गावात सुरु असलेल्या वरातीला जावून रात्री घरी येऊन झोपला होता. सोमवारी दुपारी रामदास कदम यांनी मुलगा तन्मय याला तो झोपलेल्या खोलीचा दरवाजा वाजून गोठ्यातील फॅन चालू कर म्हणून आवाज दिला होता परंतू तन्मय याने कोणताही प्रतिसाद दिला नाही.
तन्मयचा भाऊ ऋषभ यांने दुपारी जनावरांना खाद्य आण्यासाठी गाडीची चावी घेण्यासाठी तन्मय झोपलेल्या खोलीचा दरवाजा वाजवला मात्र त्याने खोलीचा दरवाजा उघडला नाही. ऋषभ यांने खोलीची खिडकी उघडून आत डोकावून पाहिले असता तन्मय यांने खोलीच्या लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे दिसून आले.
दरम्यान, ऋषभने आवाज देवून वरील प्रकार वडिल रामदास यांना सांगितला. ते खोलीचा दरवाजा तोडून आत गेले असता मुलगा तन्मय यांने खोलीच्या लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. पुढील तपास पोलीस हवालदार गर्कळ करीत आहेत.