अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती: शिरुर येथील 10 वर्षाच्या अपहरण झालेल्या बालिकेची सुटका करत पोलीसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे. लताबाई बसीर काळे, आकाश बसीर काळे, सुप्रिया उर्फ रॅम्बो आकाश काळे, सर्व रा. सोने सांगवी, ता. शिरूर जि. पुणे अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 मार्च 2025 रोजी सकाळी 8 ते दुपारी १ च्या दरम्यान शिरुर शहरातील जोशीवाडी येथील राहत्या घरासमोरून 10 वर्षीय अल्पवयीन बालिकेस आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याबाबत भारतीय न्याय संहिता कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत होते.
पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, रविंद्र आव्हाड यांनी अपहरण झालेली बालिका व अज्ञात आरोपींचा शोध घेण्याकरीता शिरूर शहरामधील सुमारे 100 पेक्षा अधिक सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले. तपास करीत असताना गुन्हा घडलेल्या ठिकाणापासुन सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषन केले असता अपहरण झालेल्या बालिकेच्या पालकांना कोणीतीही पुर्वकल्पना न देता लताबाई बसीर काळे, आकाश बसीर काळे, सुप्रिया उर्फ रॅम्बो आकाश काळे, सर्व रा. सोने सांगवी, ता. शिरूर जि. पुणे हे मोटारसायकल वर आले व त्यांनी या बालिकेचे अपहरण करुन घेवुन गेले. असे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. त्यावरून लताबाई बसीर काळे, आकाश बसीर काळे , सुप्रिया उर्फ रॅम्बो आकाश काळे, यांना ताब्यात घेतले असता त्यांनी बालिकेचे अपहरण करून तीला बेलापुर मुंबई येथे नातेवाईकांकडे ठेवले असल्याची कबुली दिली .
नातेवाईकांकडे ठेवताना ही मुलगी आमची असुन आम्ही उपचारासाठी दवाखान्यामध्ये जात आहोत आम्ही परत आल्यावर तीला घेवुन जातो असे खोटे सांगितले.
महिला पोलीस अंमलदार गीता सुळे यांच्या पथकाने बेलापुर, मुंबई येथे जावून अपहरण झालेल्या बालिकेस शिरुर येथे घेवून आले व त्या बालिकेस नातेवाईकांकडे सूपूर्त केले.
या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथ जगताप, महिला पोलीस अंमलदार गीता सुळे, पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, रविंद्र आव्हाड, सचिन भोई, अजय पाटील यांच्या पोलीस पथकाने केला आहे .