उरुळी कांचन, (पुणे) : स्वामी विवेकानंद अकॅडमी उरुळी कांचन येथील विद्यालयाच्या स्काऊट गाईड पथकातील दहा विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड राज्य पुरस्कार मिळाला आहे. यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भारत स्काऊट गाईड राज्य कार्यालयाच्या वतीने दरवर्षी पुरस्कार चाचणी शिबिराचे आयोजन केले जाते. जानेवारी 2025 महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या शिबिराचे आयोजन राज्य प्रशिक्षण केंद्र, रामबाग, भोर येथे करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये स्वामी विवेकानंद अकॅडमी विद्यालयातील स्काऊट (मुले) अविनाश दिगंबर वतने, निलराज रामराज काकडे, श्रेयस सचिन हेंद्रे, स्वराज अमोल धुळे, सोहम संदीप खेडेकर तर गाईड (मुली) अदिती अमोल महाडीक, वैष्णवी अजित मचाले, ईशा संदीप चौधरी, सई किरण वांझे, खुशी रूपेश नहार या दहा स्काऊट व गाईडने सहभाग घेतला सर्व स्काऊट गाईड शिबीरातील राज्य पुरस्कार परीक्षेमध्ये यशस्वी झाले. त्याचा नुकताच फेब्रुवारी महिन्यात निकाल लागला व सर्व दहा स्काऊट व गाईड यांना राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.
राज्यातून अनेक विद्यार्थी सहभागी होतात वरील परीक्षेसाठी विद्यालयाचे स्काऊट शिक्षक नागेश काळभोर व गाईड शिक्षिका दिपाली शिर्के यांनी मार्गदर्शन केले. स्वामी विवेकानंद अकॅडमीची ही प्रथम बॅच असून पहिल्याच बॅचने राज्य पुरस्कार प्राप्त केला आहे. यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, राज्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे, संस्थेचे अध्यक्ष सुरेश कांचन, इंद्रभान धुमाळ, पंडीत कांचन, संभाजी कांचन , प्राचार्य डॉ. सुमित दास तसेच स्वामी विवेकानंद प्रतिष्ठाणचे सर्व ट्रस्टी मेंबर यांनी अभिनंदन केले. यापुढील असणाऱ्या ‘राष्ट्रपती पुरस्कार’ तयारीसाठी विदयार्थीना शुभेच्छा दिल्या.
अशी असते स्काऊट शिबिरात परीक्षा..
परीक्षेमध्ये लेखी तोंडी प्रात्यक्षिक स्वरूपाच्या 35 परीक्षा घेतल्या जातात यामध्ये मागच्या खुणा, प्रथमोपचार, बंधने, अंदाज, उंची, खोली, गाठीचे विविध प्रकार, तंबू सजावट, विविध प्रकारचे गॅजेट्स, विना भांड्याचा स्वयंपाक, विविध प्रावीण्य पदकांच्या परीक्षा बी.पी. सिक्स व्यायामाचे प्रकार, नियम, वचन, स्काऊट गाईड चळवळीचा इतिहास आदी विषयांवर लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक स्वरूपाच्या परीक्षा घेतल्या जातात हे शिबिर चार दिवस मुक्कामी असते.