भिगवण(पुणे): प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरुवातीला भिगवन गावामध्ये प्रभात फेरी व परंपरेनुसार सरपंच, ग्रामपंचायत मेंबर्स, गावातील प्रतिष्ठित लोक, पालक वर्ग, पत्रकार तसेच विद्यार्थी व इतर गावातील मान्यवर ध्वजावंदनासाठी बहुसंख्येने हजर होते.
सर्वांच्या उपस्थितीमध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ.अमोल खानावरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ध्वजारोहणानंतर मुलांनी विविध कलागुणांना वाव देत देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले. त्यानंतर शाळेच्या अभिमानास्पद कामगिरी केलेल्या अशा मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये कु.संगीता शिवाजी गुंजाळ महाराष्ट्रामध्ये मुलींमध्ये पहिल्या नंबरने पास होऊन प्रथम अन्नसुरक्षा अधिकारी म्हणून तसेच मंजिरी ढवळे यांचाही प्रथम अन्नसुरक्षा अधिकारी म्हणून एमपीएससी पास झाल्या नंतर निवड झालेली आहे.
तसेच कु.मृणाल पांडुरंग जराड यांची कालवा निरीक्षक जलसंपदा विभाग सोलापूर येथे निवड झाली आहे.हे सर्व सत्कारमूर्ती संस्थेतील माजी विद्यार्थिनी आहेत.यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांनी संस्थेबद्दल,शिक्षकांबद्दल ऋण व्यक्त केले.
यशराज वायसे हा 25 किलो वजनी गटातून तालुका कुस्ती स्पर्धेत पहिला, जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्यात दुसरा नंबर पटकावला.त्यानंतर शहीद मुलाणी हा 51 किलो वजनी गटात इंदापूर तालुक्यात पहिला आला व पुणे जिल्ह्यामध्ये त्याची निवड झालेली आहे म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.चंद्रकांत खानावरे यांनी मनोगत व्यक्त करताना आमच्या संस्थेसाठी ही अभिमानास्पद बाब असुन संस्थेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवण्याचे काम यांनी केले आहे तसेच सर्व मुलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर संचालक सचिन बोगावत, संचालिका प्रमिला जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव डॉ.अमित खानावरे, संचालक धनाजी थोरात, संचालिका मालन खानावरे,लतिका वांझखडे डॉ.स्मिता खानावरे, डॉ.शिवराणी खानावरे तसेच अभय रायसोनी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झाकणे बापूराव व सौ.हेमाली शिंदे तसेच विद्यार्थी, संस्थेमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका साळुंखे तसेच वाघ यांनी केले.