सासवड : कोकणातील मालवण येथील अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला, त्या दुःखद घटनेचा सासवड येथे शिवतिर्थावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर पुरंदर तालुक्यातील तमाम शिवप्रेमींनी घटनेचा निषेध केला. यावेळी शिव- शाहीरांच्या पवाड्याने उपस्थित समूदायाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती शिवरायांचा जयजयकार करीत मानवंदना देण्यात आली.
यावेळी शिवसेना उबाटा गटाचे पुरंदर तालुका प्रमुख अभिजित जगताप, काॅंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदिप पोमण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अभिजित जगताप यांनी छत्रपती शिवयायांचा पुतळा कोसळल्याने तीव्र शब्दांत महाराष्ट्र सरकारचा निषेध केला. तसेच यामध्ये दोषी असलेल्या संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी विविध पक्ष संघटनेच्या वतीने या दुर्दैवी घटनेचा निषेध करुन छत्रपती शिवाजी महारांजाना सामूहिक मानवंदना देण्यात आली. शिव- शाहींरांच्या पोवाड्याने छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव करुन राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उबाठा गटाचे तालुका प्रमुख अभिजित जगताप यांनी केले होते.