पुणे : पिंपरी चिंचवडमधील मागासवर्गीय वस्तीगृहामध्ये विद्यार्थिनींच्या खोलीबाहेर पिझ्झाचा बॉक्स सापडला आहे. ज्या विद्यार्थिनींच्या खोलीबाहेर पिझ्झाचा बॉक्स सापडून आला आहे, त्या विद्यार्थिनींवर कारवाईचा बडगा उगरण्यात आला असल्याची घटना समोर आली आहे. खोलीतील चार विद्यार्थिनींना पुढील एक महिना येण्यास मनाई करण्यात आली आहे. यासंबंधीची नोटीस सध्या व्हायरल झाली आहे. याबाबत समाज माध्यमांत या कारवाईवरून संताप व्यक्त केला जात आहे.
वस्तीगृहात बाहेरचे खाद्यपदार्थ मागवण्याची बंदी करण्यात आली आहे, असं असताना 31 जानेवारीला पिझ्झाचा बॉक्स वस्तीगृहातील खोलीबाहेर आढळून आला. यावरुन त्या खोलीतील एकीने हा पिझ्झा ऑर्डर केला असेल, हा अंदाज लावण्यात आला. तसेच चौघींना याबाबत विचारणं केली असता त्यातील एकीने ही पिझ्झा ऑर्डर केल्याचं मान्य केलं नाही.
त्यामुळं 6 फेब्रुवारीला चौघींपैकी एकीने याची कबुली दिली नाही, तर 8 फेब्रुवारीपासून एक महिना वस्तीगृहात येण्यास मनाई करण्यात येईल, असं या नोटीसमध्ये नमूद आहे. हिचं नोटिस सध्या व्हायरल होत आहे. त्यावरून समाज माध्यमात संतापाची लाट उसळली आहे.