पोपट पाचंगे
रांजणगाव गणपती: महिलांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत रांजणगाव एमआयडीसी पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी व्यक्त केले. रांजणगाव एमआयडीसी, ता. शिरुर येथील पोलिस ठाणे महिला दक्षता समितीच्या वतीने आयोजित महिला दिन कार्यक्रमात पोलिस निरीक्षक वाघमाडे बोलत होते. यावेळी राजमाता जिजाऊ व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. पोलिस निरीक्षक वाघमोडे यांच्या हस्ते उपस्थित महिलांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला पोलिस उपनिरीक्षक सविता काळे, शिवाजी मुंडे, महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा सुलभा नवले, सदस्या वंदना पोटे, श्वेता ओस्तवाल, सुवर्णा खेडकर, मनिषा पाचंगे, सुरेखा नवले, मीना गवारे, वैशाली नवले यांसह महिला पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांचा नुकताच विशेष गौरव करण्यात आल्याने आज यावेळी महिला दक्षता समितीच्या वतीने पोलिस निरीक्षक वाघमोडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी सविता काळे यांनी आभार मानले.