Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवतजवळ मध्यरात्री पिकअपला पेटवून देण्याचा थरार; दोन लाखांचे नुकसान, दोघांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 8 June 2026, 13:07

यवत, ता. ८ : दौंड तालुक्यातील बोरीभडक येथे उभी असलेली भाजीपाला वाहतूक करणारी पिकअप गाडी मध्यरात्री पेटवून देण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून, याप्रकरणी एका संशयितासह अज्ञात इसमाविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पिकअप मालकाने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जितेश थोरात (रा. माळशिरस, ता. पुरंदर) आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे महिंद्रा पिकअप (एमएच ४२ बीएफ ७३५६) ही गाडी असून, विकास राजेंद्र जाधव (रा. बोरीभडक, ता. दौंड) हा चालक म्हणून काम करतो. तो दररोज यवत येथून भाजीपाला घेऊन पुण्यातील गुलटेकडी मार्केटमध्ये वाहतूक करत असे. दि. २९ मे रोजी विकास जाधव हा भाजीपाला घेऊन पुण्यात गेला होता. रात्री साडेअकराच्या सुमारास त्याने मालकाला आपण घरी परतल्याची माहिती दिली. मात्र, पहाटे दोनच्या सुमारास त्याचा घाबरलेल्या अवस्थेतील फोन आला. “आपली पिकअप गाडी पेटली आहे, तातडीने या,” असे त्याने सांगितले.

 

त्यानंतर फिर्यादी आणि त्यांचे नातेवाईक बोरीभडक येथे पोहोचले असता, विकास जाधव आणि त्याच्या कुटुंबीयांनी पाण्याच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले होते. सुरुवातीला विकास जाधव याने गाडीला आग कशी लागली याची माहिती नसल्याचे सांगितले. मात्र, नंतर विश्वासात घेतल्यानंतर त्याने धक्कादायक खुलासा केला. दि. ३० मे रोजी पहाटे सव्वा एकच्या सुमारास घराबाहेर आवाज आल्याने त्याने खिडकीतून पाहिले असता, जितेश थोरात आणि त्याच्यासोबत एक अज्ञात व्यक्ती पिकअपजवळ उभी असल्याचे दिसले. दोघांच्या हातात बिस्लरीच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल होते.

आरोपीनं पिकअपच्या काचा फोडून केबिनमध्ये डिझेल टाकले, तर साथीदाराने मागील भागातील क्रेटवर पेट्रोल ओतले. त्यानंतर जितेश थोरात याने काडीपेटीने आग लावून दोघांनी घटनास्थळावरून पलायन केल्याचे चालकाने सांगितले. या आगीत पिकअपचे मोठे नुकसान झाले असून अंदाजे दोन लाख रुपयांची हानी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, यवत पोलिसांनी जितेश थोरात आणि त्याच्या अज्ञात साथीदाराविरुद्ध मालमत्तेचे नुकसान, जाळपोळ आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ऊर्जा युद्धावर भारताचा मास्टरस्ट्रोक! 40 हजार कोटींची गॅस पाइपलाइन; थेट ओमानमधून मिळणार गॅस

Tuesday, 9 June 2026, 22:59

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली ‘गलिच्छ’ धंदा! हिंजवडीतील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका

Tuesday, 9 June 2026, 22:28

मराठी अभिनेत्री पूजा सावंतच्या गाडीचा भीषण अपघात! पुण्याहून सांगलीला जाताना तीन गाड्यांची धडक

Tuesday, 9 June 2026, 21:46

विमाननगरमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट; प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स व ई-सिगारेट विक्रीप्रकरणी एकाला अटक

Tuesday, 9 June 2026, 21:08

आंदेकर टोळीचा ‘सराईत’ गजाआड; हडपसरमध्ये सापळा रचून गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Tuesday, 9 June 2026, 20:39

औषध माफियांना दणका! कोल्हापूर-पुण्यात FDA चा छापा; 24.87 लाखांचा अवैध साठा जप्त

Tuesday, 9 June 2026, 19:52
Next Post

धोंड्यासाठी आणलेल्या अंगठीसाठी मांजरीचे पोट कापले अन् नंतर..; नेमकं प्रकरण काय? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.