उरुळी कांचन, (पुणे) : टिळेकरवाडी (ता. हवेली) येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी संतोष सुखदेव राऊत यांची तर उपाध्यक्षपदी अमर अंकुश टिळेकर यांची यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया टिळेकरवाडी येथील ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (ता. 09) सरपंच गणेश टिळेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी संतोष राऊत यांची तर उपाध्यक्षपदी अमर टिळेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी गावचे सरपंच गणेश टिळेकर, उपसरपंच वैशाली चौरे, माजी सरपं सुभाष लोणकर, सदस्य सुशील राऊत, गोवर्धन टिळेकर, नंदाताई राऊत, ग्रामसेवक प्रवीण खराडे, पोलीस पाटील विजय टिळेकर, दिलीप टिळेकर, श्याम टिळेकर, राजेंद्र टिळेकर, विनोद बेंगळे, सुभाष टिळेकर, अक्षय राऊत, राजेंद्र टिळेकर, विकास टिळेकर, रोहन टिळेकर, धर्मेंद्र टिळेकर, प्रशांत टिळेकर, मच्छिंद्र टिळेकर, झगडे, रोहन टिळेकर, अक्षय टिळेकर, प्रणव टिळेकर, सौरभ टिळेकर,आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
दरम्यान, टिळेकरवाडी गावाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवीन सर्व समाजात ऐकीचे कसे वातावरण राहिल याचे पूर्ण प्रयत्न करेन असे प्रतिपादन नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष राऊत व उपाध्यक्ष अमर अंकुश टिळेकर यांनी केले.