Sunday, May 11, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yerwada Crime News: स्थानबद्ध सराईत गुन्हेगारावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; एका वर्षासाठी कारागृहात रवानगी 

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 22 February 2025, 20:56

पुणे: शहरातील येरवडा भागातील सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. या पूर्वीच  सराईत गुन्हेगारावर ६ दखलपात्र गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर सीआरपीसी कलम ११० याप्रमाणे प्रतिबंधक कारवाई करून स्थानबद्ध करण्यात आले होते. मात्र तरीदेखील सराईत कारवाईस न जुमानता सतत गुन्हे करत असल्यामुळे त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.  प्रफुल्ल ऊर्फ गुड्ड्या गणेश कसबे (वय २३ रा. भिमज्योत मित्रमंडळ, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) असे एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आरोपी इसमाचे नाव आहे. आयुक्तांच्या आदेशानंतर गुन्हेगार कसबे याला बुधवारी (दि. १९ फेब्रुवारी) रोजी ताब्यात घेवुन नागपुर जिल्हा कारागृहात एका वर्षासाठी रवानगी करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, प्रफुल्ल ऊर्फ गुड्ड्या गणेश कसबे (वय २३ रा. भिमज्योत मित्रमंडळ, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे)  हा  तरूण येरवडा पोलिस्टेशनमधील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावरविरुध्द गंभीर दुखापती करणे, प्राणघातक शस्त्र बाळगणे, शिवीगाळ करणे, सामान्य नागरिकांच्या मनामध्ये दहशत व भितीचे वातावरण तयार करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे या कृत्यांतर्गत एकुण  ६ दखलपात्र स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरुध्द सीआरपीसी कलम ११० नुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. तसेच आरोपी इसमास २ वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते.

दरम्यान,  सराईत गुन्हेगार कसबे यास तडीपारची कारवाई करूनही या कारवाईस न जुमानता सतत गुन्हे करत होता.  त्यामुळे तो समाजासाठी धोकादायक ठरत होता. त्याच्या दहशती कृत्यांमुळे परिसरातील नागरीकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. त्याबरोबर तो सामाजिक स्वास्थ व सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहचवणारा धोकादायक इसम बनला होता.

यामुळे पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४ पुणे शहर यांच्या आदेशानुसार आरोपी कसबे याच्या विरोधात एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्याकडे पाठवण्यात आला होता.

त्यानुसार पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार यांनी सदर प्रस्तावाची सविस्तर पडताळणी करुन सराईत गुन्हेगार प्रफुल्ल कसबे हा सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा ठरत आहे. तसेच समाजासाठी धोकादायक व्यक्ती बनल्यामुळे त्याच्यावर एमपीडीए कायदा १९८१ कलम ३ (२) अन्वये १ वर्षे च्या कालावधीकरीता कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश  दिले आहेत.

आयुक्तांच्या आदेशानंतर गुन्हेगार कसबे याल बुधवारी (दि. १९ फेब्रुवारी) रोजी  ताब्यात घेवुन नागपुर जिल्हा कारागृहात एका वर्षासाठी रवानगी करण्यात आली आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर  अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त पुणे शहर रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ हिंमत जाधव,  सहा पोलीस आयुक्त प्राजंली सोनवणे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर  रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मेहेर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्वाती खेडकर, निगराणी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे, पोलीस हवालदार सचिन माळी, पोलीस हवालदार  सचिन शिंदे, पोलीस अंमलदार विशाल मगदुम, महीला पोलीस अंमलदार मोनिका पवार यांनी केली आहे.

पोलीस आयुक्त, पुणे शहर, अमितेश कुमार यांनी पोलीस आयुक्त, पुणे शहर आयुक्त म्हणुन कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन शरीराविरुध्द गुन्हे करणारे व नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल, यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अमंलदार यांना निर्देश दिलेले आहेत.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

संतापजनक..! शूटिंग पाहण्यासाठी गेलेल्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाकडून अत्याचार; परिसरात खळबळ

Sunday, 11 May 2025, 20:15

पुरंदर पंचायत समितीला पूर्ण वेळ गटविकास अधिकारी कधी मिळणार? नागरिकांकडून प्रश्न उपस्थित 

Sunday, 11 May 2025, 19:28

लाडक्या बहिणींची चिंता वाढली ; ‘या’ महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही

Sunday, 11 May 2025, 19:00

अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्या हॉटेल चालकासह 4 जणांवर गुन्हा दाखल

Sunday, 11 May 2025, 18:42

नागपुरात कुत्र्यांचा कहर; 6 वर्षाच्या चिमुकल्यावर तीन भटक्या कुत्र्यांचा प्राणघातक हल्ला

Sunday, 11 May 2025, 18:05

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर, अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी

Sunday, 11 May 2025, 17:51
Next Post

येरवडा पोलिस स्टेशन हद्दीतील वाहनचोरी करणारा पोलिसांकडून जेरबंद

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.