पुणे: शहरातील संगमवाडी रस्त्यावरुण येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या लुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त पोलीस सह-आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर यांनी हद्दीमध्ये पेट्रोलिंग करुन जबरीचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांकडून आसिफ अजगर शेख, (वय ३२ वर्षे) कुलदिपसिंग युवराजसिंग जुनी, (वय २३ वर्षे) मख्खनसिंग लाखनसिंग जुनी, ( वय ३२ वर्षे) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हिम्मत जाधव, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, श्रीमती प्रांजली सोनवणे सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग यांनी केलेल्या सूचनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यां च्या मार्गदर्शनाखाली (दि. १७) रोजी तपास पथकाचे पोलीस अंमलदार विशाल निलख, अमोल गायकवाड यांना एक बातमी मिळाली की, संगमवाडी रोडवरुन रात्रीच्या वेळी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना लुटणारे संशयीत इसम संगमवाडीत थांबलेले आहेत.
सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा यांना कळविली असता. त्यांनी मिळालेल्या माहिती वरुन कारवाई करण्यासंबंधित आदेश दिले. त्यानुसार सर्व्हेलन्स पथकाचे पोलीस उप-निरीक्षक प्रदिप सुर्वे व तपास पथकाचे पोलीस अंमलदार विशाल निलख, अमोल गायकवाड, तुषार खराडे, दत्ता शिंदे, प्रशांत कांबळे यांनी तेथे जावून संशयीत इसमांना पळून जात असताना अतिशय शिताफीने पकडले.
आसिफ अजगर शेख, (वय ३२ वर्षे) कुलदिपसिंग युवराजसिंग जुनी, (वय २३ वर्षे) मख्खनसिंग लाखनसिंग जुनी, ( वय ३२ वर्षे) रा. पाटील इस्टेट, शिवाजी नगर पुणे इथले असल्याचे समोर आले आहे. चोरट्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी येरवडा भागामध्ये (दि. १५) रोजी चोरी केल्याचे कबूल केले आहे. या बाबत फिर्यादींणि त्यांच्या गळ्यातील चैन जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेल्याबबत येरवडा पोलिस स्टेशन येथे कलम ३०९ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली १ लाख रुपयां ची अॅटो रिक्षा व गुन्हयातील चोरीस गेलेली ७५ हजार रुपयांची दिड तोळयाची सोन्याची चैन असा एकूण १ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी अमितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, पोलीस सह-आयुक्त, मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, हिम्मत जाधव, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४ प्रांजली सोनवणे सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, रविंद्र शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक येरवडा, पल्लवी मेहेर, पोलिस निरीक्षक गुन्हे, स्वाती खेडकर, पोलिस निरीक्षक गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली सर्व्हेलन्स अधिकारी पोलिस उपनिरीक्षक प्रदिप सुर्वे, तपास पथकाचे पोलिस हवालदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, विशाल निलख, अमोल गायकवाड प्रशांत कांबळे, बालाजी सोगे, नटराज सुतार, भीमराव कांबळे यांनी केलेली आहे.