पुणे: पुणे शहरामध्ये वाहनचोरी गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त पोलीस सह-आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर यांनी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करुन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्या संबंधित सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी सुरज संतोष माने (वय २४ वर्षे, रा. रामनगर, येरवडा पुणे) याला जेरबंद केले आहे.
अधिक माहिती अशी की, सदर सुचनांच्या अनुषंगाने हिम्मत जाधव, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, प्रांजली सोनवणे सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग यांनी केलेल्या सूचना नुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली (दि. १८) रोजी तपास पथकाचे पोलीस हवालदार तुषार खराडे, पोलीस अं. बालाजी सोगे, भिमराव कांबळे यांना त्यांच्या बातमीदारा कडून अशी माहिती मिळाली की, रामनगर येथुन पांढऱ्या रंगाची अॅक्टीव्हा चोरी केलेला इसम सदर दुचाकी विक्री करण्यासाठी मेंन्टल ग्राऊंड येरवडा येथे आलेला आहे.
सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळताच पोलिस त्या ठिकाणी पोहचले. सदर ठिकाणी एक इसम सोबत पांढऱ्या रंगाची अॅक्टीवा घेऊन थांबलेला दिसला. त्यानंतर तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक सुनिल सोळंके, पोलिस अंमलदार तुषार खराडे, बालाजी सोगे, भीमराव कांबळे, प्रशांत कांबळे, नटराज सुतार यांनी त्यास पळून जात असताना अतिशय शिताफीने पकडले.
त्यास नाव व पत्ता विचारला असता त्याने सुरज संतोष माने, वय २४ वर्षे, रा. रामनगर, येरवडा पुणे असे सांगितले. त्यानंतर त्याच्याकडील दुचाकीबाबत खात्री केली असता येरवडा पोलीस स्टेशन येथे गु र नं १२७/२०२५ बीएनएस ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्या कडून ३० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल हस्तगत करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी अमितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर रंजनकुमार शर्मा, पोलीस सह-आयुक्त, मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, हिम्मत जाधव, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, प्रांजली सोनवणे सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, रविंद्र शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक येरवडा, पल्लवी मेहेर, पोलिस निरीक्षक गुन्हे, स्वाती खेडकर, पोलिस निरीक्षक गुन्हे, येरवडा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक सुनिल सोळुंके, सर्व्हेलन्स अधिकारी प्रदिप सुर्वे, पोलिस हवालदार दत्ता शिंदे, पोलिस हवालदार तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, पोलिस अंमलदार अनिल शिंदे, विशाल निलख, अमोल गायकवाड, प्रशांत कांबळे, बालाजी सोगे, नटराज सुतार, भीमराव कांबळे यांनी केली आहे.