पुणे : शहरात काही दिवसांपूर्वी एका डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली होती. एका डॉक्टरने विवाहाचे आमिष दाखवून डॉक्टर तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आरोपी डॉक्टरने तरुणीकडून दहा लाख रुपये घेऊन तिची फसवणूक केली होती. अखेर आता सांगलीतील एका डॉक्टरला बिबवेवाडी पोलिसांनी नवी मुंबई परिसरातून अटक केली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, एका डॉक्टरने विवाहाचे आमिष दाखवून डॉक्टर तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केले होते. त्यानंतर आरोपी डॉक्टरने तरुणीकडून दहा लाख रुपये घेऊन तिची फसवणूक केली होती. याबाबत डाॅक्टर तरुणीच्या वडिलांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. डॉक्टर कुलदीप आदिनाथ सावंत (वय ३० रा. उमराणी रोड, शंकर कॉलनी, जि. सांगली) असे आरोपीचे नाव आहे. त्याला बिबवेवाडी पोलिसांनी आता अटक केली आहे. आरोपी डॉक्टरला नवी मुंबई परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.
विवाह संकेतस्थळावरून दोघांची ओळख
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सावंतने एका विवाह संकेतस्तळावर आपली नोंदणी केली होती. या संकेतस्थळावर बिबवेवाडीतील डाॅक्टर तरुणीची आरोपी सावंतशी ओळख झाली होती. या प्रकरणात तिला विवाहाचे आमिष दाखवले. आरोपी सावंत हा विवाहित होता मात्र ही बाब त्याने डाॅक्टर तरुणीपासून लपविली होती. त्यानंतर विवाहाचे आमिष दाखवून डॉक्टर तरुणीकडून त्याने दहा लाख रुपये घेतले होते. डॉक्टर तरुणीने त्याला लग्नाबद्दल विचारले असता तो व्यवस्थित प्रतिसाद देत नव्हता.
आरोपी डॉक्टरला मुंबईतून अटक
मात्र त्याला विचारले असता तो विवाहित असल्याचे त्याने सांगितले. या मुळे तरुणीला मानसिक धक्काच बसला. त्यानंतर नैराश्यात जाऊन ७ जानेवारी रोजी बिबवेवाडीतील दवाखान्यात डाॅक्टर तरुणीने विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केली होती. तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आणि फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी डाॅक्टर कुलदीप सावंतविरुद्ध तरुणीच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तो पसार झाला होता. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर त्याच्याबद्दल पोलिसांना माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला मुंबईतून अटक केली आहे.
परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, उपनिरीक्षक शशांक जाधव, सहायक पोलीस फौजदार सोमनाथ सुतार, पोलीस कर्मचारी नीलेश खोमणे, सुमित ताकपेरे, अजय कामठे, विशाल जाधव, ज्योतिष काळे, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, प्रवीण पाटील यांनी ही कामगिरी केली आहे.