पुणे : शहरातील पाषाण भागातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सायबर चोरट्यांनी एका महिलेला काळ्या पैश्याच्या व्यवहारात कारवाईची भीती दाखवली. ही महिला पुण्याच्या पाषाण भागात वास्तव्यास आहे. काळ्या पैश्याच्या व्यवहारात कारवाई बाबत भीती दाखवून १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, सायबर चोरट्यांनी एका महिलेला काळ्या पैश्याच्या व्यवहारात कारवाई बाबत भीती दाखवून १३ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. एका महिलेने या बाबत बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारादर महिला पाषाण भागात वास्तव्यास आहे. सायबर चोरट्यांनी २ जानेवारी रोजी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. आणि मुंबई गुन्हे शाखेकडून काळ्या पैश्याच्या व्यवहारा बाबत तुमच्यावर कारवाई करण्यात येणार आहे असे सांगितले. या महिलेच्या बँक खात्यातून व्यवहार केले गेले असल्याची भीती महिलेला दाखवली. या प्रकरणात अटक टाळायची असेल तर एका बँक खात्यात पैसे जमा करा असे महिलेला सांगितले. त्यानंतर संबंधित महिलेने चोरट्यांच्या खात्यात १३ लाख २३ हजार रुपये जमा केले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. सायबर चोरट्यांविरुद्ध महिलेने फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप या प्रकरणाचा तपास करत आहेत.