पुणे: शहरात जीबीएस बाबत मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील नांदेडगाव भागात गुइलेन बॅरे सिंड्रोमची मोठया प्रमाणावर वाढ दिसून आली होती. या परिसरातील पाण्याचे नमुने रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यामधील ५५ ठिकाणचे पाणी दूषित आढळले आहे. त्यामुळे ते पिण्यास अयोग्य असल्याचे समोर आले आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील नांदेडगाव भागात गुइलेन बॅरे सिंड्रोमची मोठया प्रमाणावर वाढ दिसून आली होती. आरोग्य विभागाने जीबीएसचे रुग्ण आढळलेल्या भागातील पाण्याचे नमुने आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविले होते. शहरातील नांदेडगाव परिसरात जीबीएसचा उद्रेक झाल्यामुळे तेथील सर्वाधिक नमुने घेतले होते.
या भागातील पाण्याच्या ४ हजार ७६१ नमुन्यांची तपासणी रासायनिक आणि जैविक राज्य आरोग्य प्रयोगशाळेने केली असता त्यातील ५५ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. त्यामुळे ते ते पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष प्रयोगशाळेने दिला आहे.
जीबीएस पासून ‘कशी’ काळजी घ्याल?
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जीबीएस हा आजार दुर्मिळ असल्याने याबद्दल सावधानता बाळगणे आवश्यक आहे. यावर अजून उपचार उपलब्ध नसल्याने हा आजार धोकादायक ठरत आहे. नागरिकांनी दररोज पिण्याचे पाणी बदलावे. तसेच पाणी उकळून प्यावं. तसेच नेहमी स्वच्छ आणि ताजं अन्न खावं. वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्या. रस्त्यावरचे किंवा उघड्यावरील पदार्थ खाणे कसोशीने टाळावे. या उपयांद्वारे तुम्ही गुलियन बॅरी सिंड्रोम टाळू शकता.