पुणे : पुण्यातील खराडी परिसरात दहशत माजविणार्या व रेकॉर्डवरील गुन्हेगाराला शोधुन त्याला खराडी पोलिसांनी तडीपार केले आहे. जय गौरव गायकवाड (वय 20, रा. दिनकर पठारे वस्ती, खराडी) असे या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जय गायकवाड याच्यावर शरीराविरुद्धचे 2 गुन्हे दाखल आहेत. तो खराडी परिसरात आपली दहशत निर्माण करीत होता. त्यामुळे गायकवाडच्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी खराडी पोलिसांनी तडीपाराचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांच्याकडे पाठविला होता. हिंमत जाधव यांनी कागदपत्रांची पडताळणी करुन गायकवाडला एक वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश 4 एप्रिल 2025 रोजी काढला होता. मात्र, गेले काही दिवस तो मिळून येत नव्हता. बुधवारी(16 एप्रिल) खराडी पोलिसांनी गायकवाडला पकडले. त्यानंतर त्याच्यावर तडीपारीचा आदेश बजावला. त्याला पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार शिर्के, सांगळे यांनी केली आहे.