पुणे : कोथरूड भागातून दागिने चोरल्याची घटना समोर आली आहे. येथील सदनिकेत शिरलेल्या चोरट्यांनी पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना कोथरूड परिसरातील एका सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, चोरीचा प्रकार लक्ष्यात आल्यानंतर याबाबत एका महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला या कोथरूड भागातील परांजपे शाळेजवळील ऋतुरंग सोसायटीत वास्तव्यास आहेत. चोरट्यांनी कपाटातून पाच लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार लक्ष्यात आल्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दिली.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची जाऊन पाहणी केली. पोलीस उपनिरीक्षक बसवराज माळी याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.