पुणे: शहराच्या भेकराईनगर परिसरात एका तरुणाने वाहतूक पोलिसाच्या डोक्यात दगड घातल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्याने पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक (वय ४७) यांच्या डोक्यात दगड घातला होता. त्याच्याविरुद्ध काळेपड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आता या प्रकरणी तरुणाला पोलिसांनी धाराशिव परिसरातून अटक केली आहे. त्यानंतर आरोपीने तरुणाची हडपसर भागातील भेकराईनगर परिसरातून पोलिसांनी धिंड काढली आहे. बबलू अण्णा मासाळ (वय ३५, रा. धाराशिव ) असे आरोपीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक (वय ४७) वाहतूक शाखेत कर्तव्य बजावत असताना यांच्या डोक्यात या तरुणाने दगड घातला होता. ते गुरुवारी (६ फेब्रुवारी) सायंकाळी सहाच्या वाजेच्या वेळी सासवड रस्त्यावरील भेकराईनगर परिसरात वाहतूक नियंत्रण करत होते. दुचाकीस्वार आरोपी मासाळ त्याच रस्त्यात मधेच गाडी थांबून मोबाइलवर बोलत होता. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होत होती. पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक (वय ४७) यांनी त्याला गाडी बाजूला घेण्यास सांगितले असता त्याने हवालदार नाईक यांना धक्काबुक्की करून त्यांच्या डोक्यात दगड घातला. यानंतर त्याने तिथून पळ काढला.
दरम्यान, आरोपी त्याच्या गावी धारशिवला गेला होता. तो कामासाठी पुण्यात राहत होता. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला धाराशिवमधून बेड्या ठिकल्या आहेत.
त्यानंतर पोलिसांनी त्याची भेकराईनगर परिसरातून धिंड काढली आहे. काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.