जेजुरी(पुणे): पुरंदर तालुक्यातील जेजुरी कोळविहिरे रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली. येथे झालेल्या पीकअप व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. प्रशांत शिंदे (वय 21 वर्ष ) व मुजमिल शेख (वय 22 वर्ष) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी ( ता.14) मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास जेजुरी कोळविहिरे रस्त्यावर पीकअप व दुचाकी गाडीची समोरासमोर जोरदार धडक झाली. झालेल्या भीषण अपघातात प्रशांत शिंदे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर मुजमिल शेख याचा उपचारादरम्यान मंगळवारी रुग्णालयात मृत्यू झाला.
याबाबत, जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहेत.