पुणे : मुळशी तालुक्यातील नेरे दत्तवाडी येथे भरधाव ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात एका तरुणाचा मृत्यु झाला. पंकज बाळासाहेब साने (वय 25 वर्ष, रा. साने वस्ती, नेरे, ता. मुळशी) असे अपघातात मृत्यु झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याबाबत मयत तरुणाचे वडिल बाळासाहेब रामभाऊ साने (रा. साने वस्ती, नेरे, ता़ मुळशी) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज साने हे आपल्या दुचाकीवरुन जात होते. नेरे परिसरात ढमालेनगर येथे आले असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात पंकज हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी बावधन पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे.