उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावपातळीवर कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलिसांनी ‘वन व्हिलेज वन कॉन्सटेबल’ ही संकल्पना अमलात आणली आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक गावासाठी एक पोलिस कॉन्स्टेबल नेमण्यात येणार असून, तो गावातील रहिवाशांसाठी थेट संपर्क अधिकारी म्हणून कार्य करणार आहे. अशी माहिती उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली आहे.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकांशी संपर्क वाढविणे करीता व गुन्हेगारीला आळा बसण्याकरीता “वन व्हिलेज वन कॉन्सटेबल” ही संकल्पना बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांचे संकल्पनेतुन राबविणेत येत असुन गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती, गुन्हेगारांची माहीती, उपद्रवी इसमांची माहीती संकलित करावयाची आहे. यासाठी या योजणा राबविण्यात येत आहे.
दरम्यान, नेमण्यात आलेल्या गावामध्ये प्रभावीपणे ग्राम सुरक्षादल योजना राबवायची आहे. ज्या पोलीस अंमलदार यांना त्यांचे नावाचे समोर दर्शविले प्रमाणे गावांची जबाबदारी देण्यात आली आहे. जे पोलीस अंमलदार यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करतील त्यांना बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांचेकडुन 2 हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. अशी माहितीहि यावेळी पाटील यांनी दिली आहे.
याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक शंकर पाटील म्हणाले, “कॉन्स्टेबल अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकारक्षेत्रात अर्ज चौकशी करण्याचे अधिकार असल्याने, विविध किरकोळ वाद वेळेवर आणि त्वरित सोडवले जातात. यामुळे कॉन्स्टेबल अधिकाऱ्यांमध्ये जबाबदारीची भावना देखील वाढणार आहे. संबंधित कॉन्स्टेबल अधिकारी समुदायाच्या संपर्कात राहतो आणि त्यांच्या चांगल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतो. यामुळे स्थानिक पातळीवरील समस्या सोडविण्यास मदत होते.”
पोलीस अंमलदाराचे नाव, मोबाईल नंबर व कंसात गावाचे व ठिकाणाचे नाव
पोलीस हवालदार सलीम शेख 9892123129 व सावित्रा सांगडे 6570002375
उरुळी कांचन बाजारपेठ बिट (पुणे सोलापुर हायवे पासुन उत्तरेस रेल्वे ब्रिज पर्यंत)
सहाय्यक फौजदार बापूसाहेब मत्रे, 9552576117 हवालदार आशिष उल्हाळकर, 9112047117
(उरुळी कांचन दत्तवाडी (रेल्वे ब्रिज पासुन उत्तरेस)
पोलीस हवालदार कमलेश होले – 9607575866 काळे -8055013456
(उरुळी कांचन (पुणे-सोलापुर हायवे रोड पासुन दक्षिण बाजु)
पोलीस हवालदार शैलेश लोखंडे 8605307307 तात्यासाहेब करे 9696522121 (सोरतापवाडी)
पोलीस हवालदार विशाल रासकर 9822100825, (वळती)
पोलीस हवालदार अमोल खांडेकर 8888430184, उद्धव गायकवाड 9850587699 (शिंदवणे)
पोलीस हवालदार धनंजय भोसले 9834629936, निलेश जाधव 9922603776 (कोरेगाव मूळ)
पोलीस हवालदार प्रविण चौधर 7774053010, (नायगाव)
सहा. फौजदार रमेश भोसले 9823644744 (पेठ)
पोलीस हवालदार सतीश होळकर 9637211471 (भवरापूर)
पोलीस हवालदार सुजाता भुजबळ 9022221053 (टिळेकरवाडी)
पोलीस हवालदार ऋषिकेश रासकर 7387138505 (प्रयागधाम)
सहा. फौजदार दत्तात्रय माने 9890763616 (खामगाव टेक)