पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधील अंमली पदार्थ विरोधी पथकाने हरीश सोनवणे या उच्चशिक्षित तरुणाला गांजा विकल्याप्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ६ लाख रुपये किमतीचा १० किलो गांजा जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीश हा पिंपरी-चिंचवडमध्ये कंत्राटी पद्धतीवर नोकरी करतो आणि त्याचा भाऊ देखील उच्चशिक्षित असून तो क्रीडा शिक्षक म्हणून काम करतो. हरीशने मध्यप्रदेशच्या बॉण्ड्री वर असलेल्या धुळे येथील त्याच्या गावी जवळून गांजा आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पिंपळे सौदागर येथील एका वाईन शॉपजवळ गांजा विकण्याचा प्रयत्न करताना तो पकडला गेला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने हरीशला अटक केली आणि त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही अटक पिंपरी-चिंचवडमध्ये होणाऱ्या अमल पदार्थांच्या मोठ्या प्रमाणात विक्रीवर कारवाईचा एक भाग आहे. गांजा आणि इतर अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिस परिसरात छापे टाकत आहेत आणि आरोपींना अटक करत आहेत. पैशाच्या लोभापोटी हरीशने गांजा विकण्यास सुरुवात केली असे चौकशीत समोर आले आहे.