पिंपरी- चिंचवड: आळंदी, पुणे शहर आणि ग्रामीण भागात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि मोबाईल हिसकावुन पसार झालेल्या दोघांना खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखा ३ ने बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी चऱ्होली परिसरातील प्राइड वर्ल्ड सिटी या ठिकाणी घडली होती. या प्रकरणी विश्वजीत अर्जुन पवार आणि यव्हान भास्कर कासार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दोघांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, दिनांक २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी आळंदी, पुणे शहर तसेच ग्रामीण भागात पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून त्यांना चाकूची भीती दाखवून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू घेतल्याची घटना घडली होती. याप्रकरणी दिघी व आळंदी येथील पोलीस स्टेशन सोन्याची साखळी हिसकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर घटनांचे प्रमाण वाढले होते. केवळ दोन दिवसांत १४ घटना घडल्याने पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपासची चक्रे फिरवत गुन्हे शाखा युनिट ३ चे अधिकारी व खंडणी विरोधी पथकाने आरोपींना अटक केली आहे.