पिंपरी-चिंचवड: शहरातील चिखली परिसरात खंडणी न दिल्यामुळे १६ वर्षीय अल्पवयीन सराईत गुन्हेगारने १२ वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर आता चिखली पोलिसांनी आरोपिला ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी की, चिखली परिसरात खंडणी न दिल्यामुळे १६ वर्षीय अल्पवयीन सराईत गुन्हेगारने १२ वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. खंडणी न दिल्याच्या रागातून अल्पवयीन गुन्हेगाराने रस्त्याच्याकडेला पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या १२ वाहनांची तोडफोड केली आहे. चिखलीतील मोरे वस्ती येथील पिंपरी – चिंचवड महापालिका शाळेच्या परिसरात रविवारी ९ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी या प्रकरणाबाबत आदधिक माहिती दिली आहे. संगीतल्याननुसार, मोरे वस्ती परिसरातील रहिवाशी मोटार, टेम्पो, रिक्षा अशी वाहने रस्त्याच्याकडेला उभी करतात. १६ वर्षीय अल्पवयीन सराईत गुन्हेगाराने मद्यपान केलेल्या मुलाने तक्रारदार मोटार चालका जवळ जाऊन खंडणी मागितली. मात्र, मोटारचालकाने खंडणी देण्यास नकार दिला असता. सराईत अल्पवईन आरोपी मुलाने दगडाने त्यांच्या मोटारीच्या काचा फोडल्या. त्यानंतर आजुबाजूच्या कार, टेम्पो, रिक्षा अशा बारा वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी मोटार चालकाने तक्रार दिल्यानंतर चिखली पोलीसांनी तपास करत १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.