पुणे, ता. 24 : उच्च न्यायालयाने बेडसे पाटील यांचे निलंबन रद्द केल्यानंतर त्यांचे जागी ज्योती देवरे यांच्या करण्यात आलेल्या नियुक्ती बाबत निर्णय घेण्याचे आदेश मॅट कोर्टाला देण्यात आले होते. त्यावर MAT कोर्टाने जलद सुनावणी घेत प्रशांत बेडसे पाटील यांना पुन्हा खेडच्या तहसीलदारपदी नियुक्त करण्याचे आदेश सोमवारी (ता.24) पारित केले आहेत.
याप्रकरणी निर्णय पारित करताना कोर्टाने स्पष्ट नमूद केले की, बेडसे पाटील यांना पुन्हा तहसीलदार खेड पदी नियुक्ती देणे हे न्याय संमत आहे. त्यामुळे शासनाने पुढील सात दिवसाच्या आत तहसीलदार प्रशांत बेडसे यांना तहसीलदार खेड पदी नियुक्ती द्यावी. तसेच ज्योती देवरे यांची झालेली बदली ही देखील नियमबाह्य असल्याने कोर्टाने रद्दबातल केली आहे.
दरम्यान, यापूर्वी उच्च न्यायालयाने प्रशांत बेडसे यांची करण्यात आलेले निलंबन हे अवैध ठरवत रद्द केले होते. त्यामुळे आता पुन्हा मॅट कोर्टाने दिलेल्या निकालामुळे लवकरच प्रशांत बेडसे पाटील हे तहसीलदार खेड पदी रुजू होणार हे निश्चित झाले आहे.