Monsoon Update : पुणे: वाढत्या उन्हाच्या तीव्रेतमुळे तसेच उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर विहीरी कोरड्या पडून लागल्या असून पिके करपू लागली आहेत. यामुळे राज्यातील शेतकरी काळजीत पडला आहे. असे असताना मात्र आता मान्सून केरळ राज्यात ४ जून रोजी दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. (Monsoon to enter Kerala on June 4; Forecast by Meteorological Department)
हवामान विभागाचा अंदाज
मान्सून पुढील दोन, तीन दिवसांत मालदीव बेटे, बंगालच्या उपसागरातील काही भाग आणि दक्षिण अरबी समुद्रातील काही भागांत दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे, (Monsoon Update ) अशी माहिती पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.
मान्सून १९ मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल झाला होता. पण पुढे त्याची वाटचाल मंदावली होती. गेल्या काही दिवसांपासून अंदमानातच तो स्थिरावला होता. (Monsoon Update ) आता तो नैऋत्य दिशेला बंगालच्या उपसागराकडे सरकला आहे.
मान्सून केरळमध्ये ४ जून रोजी दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, आग्नेय अरबी समुद्रावर एक वातावरणीय कुंड तयार झाले आहे. (Monsoon Update ) यामुळे केरळमधील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळमधील इडुक्की जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : सासऱ्याच्या अनैतिक संबधात सुनेचा अडथळा; नातीसमोरच क्रूरपणे संपवलं
Pune News : खेड शिवापूर टोल नाक्यावर सापडले ५ कोटींचे ड्रग ; चौघांना बेड्या