हडपसर: पुणे शहरात अनेक ठिकाणी अनाधिकृत होर्डिंग्ज उभारण्यात आलेले आहेत. हल्ली अनेक ठिकाणी होर्डिग्ज लावले जातात. त्याला कोणत्याही प्रकारचे नियम नाहीत. त्याबाबत नियमावली ठरावा, अशी मागणी असे हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे पाटील यांनी शुक्रवारी (दि. ७) विधिमंडळात प्रश्नोत्तराच्या सत्रात केली.
चेतन तुपे यांनी एकूण चार मुद्दे मांडले. सध्याचे होर्डिंग बाबतचे धोरण महानगरपालिकांना तंतोतंत राबविण्यास सांगणार का? होर्डिंगबाबत जे नवीन धोरण प्रस्तावित आहे, त्यात आरक्षित जागांवर होर्डिंग लावता येणार नाही. पण लावल्यास त्यांची परवानगी काढून घेता येईल, अशी काही तरतूद करता येईल का? महानगरपालिका किंवा सरकारने आपल्या मालकीच्या अथवा ताब्यात असलेल्या जागा, जाहिराती लावण्यासाठी भाडे तत्वावर ज्यांना दिल्या आहेत. त्यांनी पोट भाडेकरू ठेवले आहेत. नवीन धोरण तयार करताना त्यात पोटभाडेकरू ठेवता येणार नाहीत. आणि जर त्यांनी असे पोट भाडेकरू ठेवलेच तर त्यांना काढून टाकण्यात यावे अशी तरतूद करण्यात येणार आहे का? याशिवाय रस्त्यापासून आणि पदपथावर किती अंतरावर होर्डिंग्ज असावेत याचे नियम आहेत. परंतु, त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत नाही. नियम न पाळणाऱ्या कर्मचारी व होर्डिंग्ज धारकांवर कारवाई होणार का? होडिंग्ज बाबतचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न चेतन तुपे यांनी सभागृहात उपस्थित केले.