शिक्रापूर : दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात इसमाचा मृत्यू झाला. ही घटना सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर घडली. अरविंद काशिनाथ पवार (वय ३३ रा. कोंढापुरी ता. शिरुर जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत सुनील नामदेव हरगुडे (वय ३३ रा. सणसवाडी ता. शिरुर जिः पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली आहे.
अरविंद पवार हे दुचाकीहून जात असताना दुचाकी रस्त्यावर घसरल्याने रस्त्यावर पाडून गंभीर जखमी झाले. दरम्यान त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता अरविंद पवार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.