लोणी काळभोर, ता. 25 : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. शनिवारी (ता. 25) केलेल्या कारवाईत दोन ठिकाणावरून 40 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली असल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली आहे.
गोपाल रणजित नट (वय – 40, रा. घोरपडे वस्ती, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर व कचरदास अर्जुन खरात वय-66, रा. घोरपडेवस्ती, लेन नं. ८. कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे असून दोघांकडून प्रत्येकी 20 लिटर दारू जप्त करण्यात आली आहे.
लोणी काळभोर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घोरपडे वस्ती परिसरातील गोपाल नट व कचरदास खरात हे दोघे गावठी हातभट्टी दारु विक्री करत असल्याची माहिती पोलीस शिपाई अमोल दरेकर व रायबोले यांना शनिवारी मिळाली होती. त्यानुसार दोघांनी सापळा रचुन छापा कारवाई केली. सदर छापा कारवाई दरम्यान सदर दोन्ही आरोपींकडून प्रत्येकी 20 लीटर गावठी हातभट्टी दारू जप्त केली असून दोघांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सुरु आहे.
दरम्यान, लोणी काळभोर व परिसरातील अवैध धंद्यावरील कारवायांमुळे सर्व अवैध धंदे चालकांचे अवैध धंदे व अनाधिकृत कृत्यांना चाप बसविण्यात पोलीस प्रशासनास यश आले आहे. भविष्यात अशाच प्रकारच्या अत्यंत प्रभावी व दर्जेदार कारवाया करुन अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटण नष्ट करणार असल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पुणे प्राईम न्यूजशी बोलताना दिली.