लोणी काळभोर, ता. 9 : अल्पवयीन मुलीच्या बालवयाचा फायदा घेऊन तिच्यावर एका अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या विरोधात बलात्कारासह पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे लोणी काळभोरसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्भया आणि अल्पवयीन मुलगा हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहे. अल्पवयीन मुलाने निर्भयाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. व एके दिवशी निर्भया घरी एकटी असल्याची संधी साधून अल्पवयीन मुलगा निर्भयाच्या घरी गेला आहे. आणि तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अशी फिर्याद निर्भयाच्या एका नातेवाईकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे.
त्यानुसार 17 वर्षीय मुलावर भारतीय न्याय संहिता कलम 64 लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम 4, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी करीत आहेत.
जो बलात्कार करु शकतो तो अल्पवयीन कसा? त्याच्यावर प्रोढांसारखीच कार्यवाई व्हायला पाहीजे