लोणी काळभोर: जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्याबैसरण घाटीत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामस्थांनी निषेध मोर्चा काढला. यावेळी या भ्याड हल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली.
जम्मू-काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी निष्पाप हिंदूंची हत्या केली. या हल्यात सुमारे 28 हिंदूबांधव मृत्युमुखी पडले. तसेच अनेक पर्यटक म्हणून गेलेले नागरिक गंभीर जखमी झालेले आहेत.
तरी संवैधानीक मार्गाने या घटनेचा निषेध करण्यासाठी व मृत्युमुखी पडलेल्या हिंदू बांधवांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शुक्रवार दिनांक 25 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता. लोणी स्टेशन चौकातून या मोर्चास सुरुवात झाली श्री दत्त मंदिर-खोकलाई देवी चौक-नेहरू चौक-गणपती मंदिर चोक-श्री राम मंदिर श्री हनुमान मंदिर चौक येथून पुन्हा श्री खोकलाई देवी चौक या ठिकाणी श्रद्धांजली सभा झाली. यावेळी सकल हिंदू समाज बांधवांनी बहुसंख्येने आपली उपस्थिती लावली होती.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडियाचे प्रदेश सहसंयोजक मल्हार पांडे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रविण काळभोर, नवपरिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड, भाजप नेते कमलेश काळभोर, पे मनोज काळभोर, संतोष भोसले, शिवसेना (शिंदे गट) पुणे जिल्हा संघटक निलेश काळभोर, विशाल वेदपाठक, राष्ट्रीय खेळाडू सतिश काळभोर, ग्रामपंचायत सदस्य अविनाश बडदे, शिवसेना कार्यकर्ते अतुल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ नामुगुडे, सविता वर्मा, दिगंबर जोगदंड राहुल धेळे आदि उपस्थित होते.
यावेळी मोर्चेकऱ्यांकडून भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.